Posts

सजग मतदारच सजग लोकशाही निर्माण करू शकतो! 🗳️

Image
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका : जनतेने सजग व्हावे, उमेदवारांचे चारित्र्य तपासावे! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका आता दारात येऊन ठेपल्या आहेत. निवडणुका जाहीर होताच प्रत्येक उमेदवार आपला लोकसंपर्क वाढवू लागला आहे. कोणी धार्मिक वा सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रायोजक होत आहेत, कोणी समाजसेवेच्या नावाखाली लोकांवर पैसे खर्च करीत आहेत, तर काही नव्या क्लुप्त्या लढवून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. "आपण समाजोपयोगी आहोत" असे दाखविण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. परंतु या गोंधळात मतदारांनी अत्यंत सजग राहणे गरजेचे आहे. गेल्या पाच वर्षांत गावात, तालुक्यात किंवा जिल्ह्यात कोणती संकटे आली आणि त्या वेळी हेच उमेदवार कुठे होते, याचा विचार करणे अत्यावश्यक आहे. फक्त आश्वासने देणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये, तर त्यांच्या कृतीचा मागोवा घ्यावा. जनतेने विचारावे असे काही मूलभूत प्रश्न : उमेदवाराचा मागील कार्यकाळातील अहवाल काय आहे? त्याने गावात किंवा विभागात कोणती ठोस कामे केली? शासकीय निधी किती मिळाला आणि तो नेमका कुठे खर्...

An EncounteR WitH A ParroT😸

Image
नमस्कार! ही कथा/घटना काल्पनिक नसून सत्य घटनेवर आधारित आहे. घटना आणि पात्रे सुद्धा सत्य आहेत.   ही कथा आहे बाबल्याची, आता बाबल्या कोण? तर हे  कॅरेक्टर कोकणातील  प्रत्येक गावात, गावातील प्रत्येक  वाडीत, वाडीतील प्रत्येक घरात एक तरी असतेच असते, पण आमचा हा बाबल्या त्या सर्वात वेगळा. त्याला मल्टी^टॅलेंटेड च म्हणा हवतर   शेती, बागायती, वादन,पोहणे, मिमिक्री, अभिनय विविध उपकरणाच्या दुरुस्ती, वाहन चालवणे, मूर्तिकला, सगळ्यात पारंगत.अडी अडचणीला, बऱ्या वाईट प्रसंगाला धाऊन जाणे हे त्याचे नित्याचेच. एक वेळ बऱ्या प्रसंगात जरा उशिराने पण दुःखद प्रसंगात त्याची हजेरी अगदी वेळेवरच असते.आता मूळ कथेवर येतो.  असाच एकदा भल्या सक्काळीच त्याचा फोन आला. कुठे आहेस? काय करतोस? आज कुठे जाणार आहेस का? मी म्हणालो काय रे? सगळं बर आहे ना? मी अजून तरी घरी आहे. त्याच लगेच फर्मान लगेच एक रिकामा पुठ्ठ्याचा खोका घेऊन माझ्या घरी ये. मी म्हणालो कशा साठी? आणि साईझ काय?उत्तर साधारण दिड बाय दिड, लगेच ये वेळ नाही आहे.... मी लगेच आज्ञा पाळून पुठ्ठ्याचा खोका घेऊन मोटरसायकल वर...